या वेबसाईटचा उद्देश अर्मेनियन संस्कृती आणि कला या बद्दल माहिती, संशोधन सामुग्री याचं वाटप करणं, तसचं सांस्कृतीक स्मारकांच्या संवर्धनाबद्दल जागरुकता निर्माण करणं, हा आहे.
ही कदाचित चकीत करणारी गोष्ट असेल की अशा प्रकारच्या वेबसाईट फार कमी संख्येनी आहेत. मात्र आमच्या वेबसाईटचं वेगळंपण हे आहे की आम्ही प्रामुख्यानी अर्मेनियन संस्कृतीतील त्या विभागांवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे जे झाकोळले गेले आहेत आणि ज्यावर जास्त लक्ष्य देणं आवश्यक आहे, उदा. अर्मेनियन म्युरल भित्तीचित्रं.
ही वेबसाईट प्रामुख्यानी साधनसामुग्रीचं भांडार आहे. जसं: अर्मेनियन कला (“Հայ արվեստ”) त्रैमासिक, ग्रंथ, लेख, छायाचित्र, महत्वाच्या अर्मेनिशास्त्राचे (Armenology) दुवे. तसंच सांस्कृतिक कार्यक्रम, प्रस्ताव आणि नवीन कल्पनांच्या अभिव्यक्तीसाठी ही वेबसाईट एक व्यासपिठ आहे.